Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी नंतर शेवगावही झाले कोरोनामुक्त

जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज बरे होऊन घरी परतले । बरे झालेल्यांची संख्या 206

अहमदनगर । वीरभूमी - Jun 15, 2020 • 12:00 AM 3680 views
पाथर्डी तालुक्यानंतर आता शेवगाव तालुकाही कोरोनामुक्त झाला असून आज जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त या आजारातून बरे होऊन घरी परतले. आहेत. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील बरे होणार्‍या रुग्णांची संख्या 206 झाली आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शेवगाव येथील एका रुग्णासह संगमनेर 03, राहाता 02, नगर शहर 01 आणि कोपरगाव 01 समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 206 झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर शहरटाकळी, शेवगाव शहर व राणेगाव येथे कोरोना बाधित आढळून आले होते. ढोरजळगाव येथील कोरोना बाधित बरा झाल्यानंतर एका पाठोपाठ सर्वच रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे शेवगाव तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

यापुढे शेवगावकरांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून व सतर्क राहुन शेवगावला कोरोना पासून दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

रविवारी शेवगाव शहरात एक कोरोना बाधित आढळल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र त्या संशयिताचा अहवाल हा पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह आला आहे. यामुळे नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता जागृक रहावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply