Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जामखेड शहरातील एका डॉक्टरसह दोन जणांना कोरोनाची लागण

जामखेड शहरातील एका डॉक्टरसह दोन जणांना कोरोनाची लागण

जामखेड । वीरभूमी - Jul 29, 2020 • 02:37 PM 10418 views
गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरातील एका खाजगी डॉक्टरांसह एकुण दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील खासगी हॉस्पीटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या अजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी नगर येथील खाजगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली होती. तर शहरातील बीड रोडवर रहाणार्‍या एका व्यक्ती आजारी असल्याने त्या व्यक्तीने देखील नगर येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली होती. आज दि. 29 रोजी या दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही व्यक्ती शहरात रहात आहेत. त्यामुळे तब्बल तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरात पुन्हा कोरोनाने एंन्ट्री केली आहे.

तसेच काल देखील फक्राबाद येथील एक व्यक्ती व बाहेरगावी रहात आसलेल्या मात्र जामखेड शहरातील स्थानिक पत्ता आसलेल्या दोन अशा एकुण तीन जणांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सध्या दोन दिवसात शहरासह तालुक्यातील एकुण पाच व्यक्ती कोरोना बाधित अढळुन आल्या आहेत. आज डॉक्टरांसह निघालेल्या दोन व्यक्ती सध्या नगर येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टर हे पुण्याहून आल्या नंतर कॉरंटाईन झाले होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे हॉस्पिटल देखील बंद होते. मात्र शहरातील जी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात आली आसल्याने प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. सध्या लॉकडाऊन चा विचार नसला तरी नागरीकांनी जर नियम पाळले नाहीत तर मात्र कडक लॉकडाउन करण्यात येईल असे देखील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे देखिल ते म्हणाले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply