Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेतकर्‍यांना आता या योजनेत मिळणार 15 लाख रुपये

केंद्र सरकारची शेतकर्‍यांसाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरु

नवी दिल्ली । वीरभूमी - Sep 30, 2020 • 04:51 PM 1759 views
शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट व्हावे, शेतमालाला योग्य दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरु केली आहे. यात एफपीओ- किसान उत्पादक संघटनेसाठी 15 लाख रुपयांची आर्थिक साहाय्यता दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकर्‍यांना आपली कृषी कंपनी किंवा संघटना सुरू करावी लागेल. या योजनेशी संबधित शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे, औषध फवारणी इत्यादी कृषी उपकरणे घेण्यास मदत होणार आहे.

काय आहे एफपीओ योजना

एफपीओ हे शेतकर्‍यांचा एक समुह असून कंपनी अ‍ॅक्टनुसार याची नोंदणी केली जाते. या मार्फत शेतकर्‍यांच्या आर्थिक नफ्यासाठी एफपीओ काम करेल. यात कमीत कमी 11 शेतकरी एक अ‍ॅग्रीकल्चर कंपनीची स्थापना करू शकतात. 11 शेतकर्‍यांची ही संघटना स्थानिक पातळीवर काम करते. ते आपल्या संघटनेत कमीत कमी 300 शेतकर्‍यांना जोडू शकतात. यासाठी म्हणजे एफपीओसाठी सरकार 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करत असते. ही आर्थिक मदत तीन महिन्यात शेतकर्‍यांना पुरवली जाते.

संघटना स्थापित केल्यानंतर खते, बियाणे, फवारणी औषधे, कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी सूट मिळत असते. एफपीओ योजनेसाठी सरकार 2024 पर्यंत 6 हजार 865 कोटी रुपये खर्च करणार आहे. शेतकरी संघटनानांसाठी केंद्र सरकार तीन महिन्यात आर्थिक मदत पुरवत असते. यासाठी शेतकरी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करु शकतात. दरम्यान नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. पण लवकरच ही नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply