Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर-सोलापूर महामार्गावर ‘द बर्निग ट्रक’

कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात आढळला जळालेला ट्रक । पोलिस तपास सुरू

मिरजगाव । वीरभूमी - Oct 04, 2020 • 12:00 AM 1008 views
नगर - सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार आज पहाटे प्रवाशी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र ट्रकचा जळून कोळसा झाला.

नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला सदर माल वाहतूक ट्रक जळत होता. मात्र याबाबत मिरजगाव पोलिस दुरक्षेत्रासह कर्जत पोलिस स्थानक अनभिज्ञ होते. या गाडीला नंबर प्लेट नसून सरकार असे नाव आहे. तसेच यात काय माल होता? ती कुठे चालली होती? आग कशाने लागली? हा अपघात की घातपात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत वृत्त असे की, नगर सोलापूर मार्गावरील नागलवाडी गावाच्या शिवारात निमगाव गांगर्डासह 17 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी असणार्‍या रिकाम्या पाण्याच्या टाकी पासून साधारणतः शंभर मीटर अंतरावर मालवाहतूक ट्रक जळालेल्या अवस्थेत आढळली. ही ट्रक जळत असताना तेथे चालक व अजून कोणीच नव्हते. सदर गाडी जळून खाक झाली आहे.

याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता जळीत मालट्रक कशाने जळाला याबाबतचे कारण आणखीन समजले नसून सदर घटनेबाबतची फिर्याद उशिरापर्यंत दाखल झालेली नव्हती. अद्याप तरी कोणीही फिर्याद दिली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply