Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

सततच्या पावसाने फुलशेतीचे मोठे नुकसान

शेतकरी आर्थिक संकटात । फुलांच्या किंमती वधारणार

सुपा । वीरभूमी - Oct 11, 2020 • 12:00 AM 1139 views
सुपा परिसरात गेल्या दोन तीन दिवसात पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे फुलझाडे उफाळली आहेत. यामुळे दसरा दिवाळी सणामध्ये फुलांच्या किंमती वधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील महीन्यात 6-7 सप्टेंबर रोजी सुरु झालेला पाऊस सलग 15 दिवस झाला. मध्यंतरी आठ दहा दिवस उघडीप दिल्यानंतर पुन्हा शनिवार दि. 10 ऑक्टोबर पासून पुन्हा जोरदार पावसास सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अगोदरच सप्टेंबरच्या पावसाने मोठ्या प्रमाणात फुलशेतीचे नुकसान झाले आहे. त्यातुन ज्या काही थोड्याफार फुल बागा वाचल्या आहेत त्या आताच्या या पावसात जगण्याची आशा मावळली आहे.

सततच्या पावसाने फुलशेतीचे झाडे मुळापासुनच करपू लागली आहे. आताचा हा कालावधी फुले उमलण्याचा आहे. मोठ्या प्रमाणात कळ्यामधून फुले उमलत आहेत. याचवेळी रोज पडणार्‍या पावसाने फुलांच्या गाभ्यात पाणी साठुन फुले सडत आहेत. तर काही ठिकाणी खाली ओलावा व वर पाण्याने जड झालेली फुले यामुळे नाजुक झाडे पावसात आलेल्या वार्‍याने भूईसपाट होत आहे.

दसरा दिवळीच्या सणा निमित्ताने सुपा परिसरात शेंवती, झेंडू, अष्टर, गुलछडी, गुलटोप गलांडा ही फुलेशेती घेतली जातात. त्यांना गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळीत खुप मागणी असते. शेतकर्‍यांचे सणासुदीच्या काळात याच फुलशेतीमुळे मोठे अर्थकारण फिरते. गेली सात आठ महीने पाणी भरुन खते, औषधे, बी बियाने यांना मोठा खर्च केल्यावर आता कुठे दोन पैसे मिळणार असतांनाच निसर्गाने तोंडचा घास पळवला आहे.

शहाजापूर येथे तर काही शेतकर्‍याचे शेंवती पिक पुर्ण वाया गेल्याने त्यांनी ते एक रुपयाचेही उत्पन्न न मिळवता काढुन टाकण्यास सुरूवात केली आहे. चालू वर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने अगोदर मूग पिक गेले. भाजीपाल्याची पिके सडली. बाजरी पिकेही ऐन काढणीच्या काळात वादळी वार्‍यांनी सपाट झाली. आता थोडीफार आशा फुलशेतीवर होती, तीही आता संपली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply