Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

चौंडी बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे गेले वाहुन

चौंडी बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे गेले वाहुन

जामखेड । वीरभूमी - Oct 13, 2020 • 12:00 AM 2636 views
चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेले. पाण्याचा प्रवाह जादा आसल्याने मदतकार्यात अडथळे येत आसुन घटनास्थळी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे तळ ठोकून आहेत.

जामखेड तालुक्यात सध्या मागिल अठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आसल्याने तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसांडून वहात आहेत. चौडीं येथील सीना नदीला देखील पुर आला आसुन येथील के टी वेअर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. आज दि १३ रोजी सायंकाळी येथे राहाणारा पुतण्या तुषार गुलाबराव सोनवणे वय २२ त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे वय ४३ व इतर एक आसे तीघे जण मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते. चलते पुतणे हे या केटीवेअर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला मासे पडत होते तर तीसरा हा बंधाऱ्याच्या बाजुला बसला होता. याच दरम्यान पाण्याचा वेग जादा आसल्याने या मध्ये चुलता व पुतण्या हे पाण्यात पडुन वाहुन गेले. ही घटना बाजुला उभ्या आसलेल्या दुसर्‍या मुलाने गावात जाऊन सांगितली यानंतर सदर ची घटना लक्षात आली.

घटनेची माहिती समजताच तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आसल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर रात्री आंधार आसल्याने शोधकार्यात अडथळे येत. सध्या या ठिकाणी जनरेटरच्या लाईट द्वारे शोधमोहीम सुरू आसुन रात्री उशिरा पर्यंत या दोघांचा शोध लागला नाही अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply