Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

वनअधिकार्‍यांच्या नियोजनाअभावी दिवसभर नरभक्षक बिबट्याचा पथकाला चकवा

दिवसभर डोंगर-दर्‍यांतून फिरूनही बिबट्याचा शोध लावण्यात वनविभाग अपयशी । नागरिकांत भीतीचे वातावरण कायम

पाथर्डी । वीरभूमी - Oct 31, 2020 • 12:00 AM 3882 views
तीन बालकांचा जीव घेतल्यानंतरही नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यात वनविभागाला तिसर्‍या दिवशीही अपयश आले. जळगाव, औरंगाबाद, नाशिक, नगर व आष्टी येथील पथकांच्या मदतीने पाथर्डी व तिसगाव येथील वनकर्मचारी यांनी दिवसभर डोंगर दर्‍यातून शोध घेतला. मात्र वरीष्ठ अधिकार्‍यांच्या योग्य नियोजनाच्या आभावाने बिबट्या चकवा देण्यात यशस्वी झाला. यामुळे नागरिकांच्या मनात भितीची वातावरण काय आहे.

याबाबत तिसगाव वनविभागाचे श्री. वाघुळकर यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपले तपासाचे पितळ उघडे पडू नये म्हणुन माहिती देण्याचे टाळले.

मढी, केळवंडी व शिरापूर अशा ठिकाणच्या तीन बालकांचा जीव घेतल्यानंतर वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर वनमंत्री राठोड व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सुचना वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. मात्र मंत्र्यांच्याही सुचना वन अधिकारी गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. वनकर्मचारी दिवसभर डोंगर दर्‍या पायी चालत बिबट्याचा शोध घेत आहेत.

बिबट्याल पकडण्यासाठी गर्भगिरी डोंगर रांगा परिसरात पिंजर्‍यांची संख्या वाढवली आहे. मात्र दिवसभर शोध घेवूनही बिबट्या कोणत्या भागात आहे, याचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले आहे. वनकर्मचारी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनांचे पालन करतात मात्र वन अधिकारी यांनाच तपासाची दिशा ठरवता येत नसल्याने बिबट्या सापडणे सध्यातरी अवघड दिसत आहे. यामुळे परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आपले जीवन जगत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply