Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सावरगाव परिसरात बिबट्या जेरबंद

वनविभागाच्या प्रयत्नांना आठवड्यानंतर यश

पाथर्डी । वीरभूमी - Nov 05, 2020 • 12:00 AM 5646 views
गेल्या पंधरा दिवसापासून गर्भगिरी डोंगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर आज पहाटे सावरगाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात अडकला. पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या हाच नरभक्षक आहे की, नाही याचा शोध घेतला जात आहे.

मागील आठवड्यात शिरापूर, मढी व केळवंडी परिसरातील तीन बालकांचा बिबट्याने जीव घेतला होता. यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते. आता बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मागील काही दिवसापूर्वी मढी, केळवंडी व शिरापूर येथील तीन लहान बालकांवर हल्ला करत बिबट्याने ठार केले होते. शिरापूर येथील घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत होती. यामुळे वनविभागाने तातडीने हालचाली करून बिबट्या जेरबंद करण्यासाठी जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगर, बीड जिल्ह्यातील पथके ठाण मांडून होते. मात्र आठदिवसाचा कालावधी लोटला तरी बिबट्या जेरबंद होत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. वनविभागाने गर्भगिरी डोंगर रांगाच्या परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंजरे लावण्यात आली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सावरगाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या अलगद अडकला. पिंजर्‍यात शिकार म्हणुन ठेवलेला बोकड बिबट्याने अर्धा फस्त केला.

या बिबट्याचा वावर हा शिरापूर, मढी, सावरगाव, करडवाडी या परिसरात होता. सावरगाव येथील पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या हा वनविभागाला पाहिजे तोच आहे का नाही, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनीही वनविभागाची खात्री पटेपर्यंत सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply