Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

कोल्हे परिवाराने केली कोपरगावच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड

कोल्हे परिवाराने केली कोपरगावच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड

कोपरगाव । वीरभूमी - Nov 14, 2020 • 12:00 AM 825 views
राज्य सरकार मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेत नसल्याने शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर बंद आहे. यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असलेल्या कोपरगावच्या रिक्षाचालकांना याचा सर्वाधिक फटका बसला. दिवाळीसारखा मोठा उत्सवाचा सण साजरा कसा करायचा, असा प्रश्न या बांधवापुढे उभा राहिला असतांना कोपरगावकरांवरील संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव अग्रभागी असलेल्या संजीवनी उदयोग समुहाने फराळासाठीचे साहित्य देउन येथील रिक्षाचालकांची दिवाळी गोड केली. कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते रिक्षाचालकांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, रिक्षा संघटनेचे कैलास जाधव, राजेंद्र सालकर, भाजपा अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, शहराध्यक्ष दत्ता काले, साजीद पठाण रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विवेक कोल्हे पुढे म्हणाले, सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या काळात हातावरची पोटं असणा-या नागरीकांना इतर राज्यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे. कोपरगावकरांवरील संकटाच्या वेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेहमीच संजीवनी उदयोग समूह मदतीसाठी धावून आलेला आहे. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी ज्यावेळी कोपरगावकरांवर संकट आले असेल, त्या त्या वेळी त्यांना मदतीचा हात दिलेला आहे. संकटात सापडलेल्या नागरीकांना आधार देउन त्यांच्या घरात दिवा पेटावा हीच भावना कोल्हे परिवाराने आजपर्यंत जपली आहे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी सुमारे २० वर्षापूर्वी समाजातील सर्वच घटकातील महिलांना एकत्र करून बचत गट चळवळीच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम केले आहे. महिलांना ख-या अर्थान सक्षम करण्याचे काम करून त्यांच्यातील आत्मबल वाढविले आहे.

हा समाजसेवेचा वारसा अखंडपणे सुरू असुन याच भावनेतून आपल्या रिक्षाबांधवाची दिवाळी गोड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिर्डीतील श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्याने कोपरगावकरांना मोठी झळ बसली आहे. येथील रिक्षाचालकांना त्याचा सर्वाधिक फटका बसल्याने त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे श्री कोल्हे म्हणाले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply