Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर

निवडणुकांसाठी 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

अहमदनगर । वीरभूमी - Nov 21, 2020 • 12:00 AM 3944 views
माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित अशा सुमारे 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडण्यास डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित झालेल्या 1566 व माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे 12667 अशा एकुण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

आता नव्याने राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 1 ते सोमवार दि. 7 डिसेंबर 2020 पर्यंत प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करणे. तर गुरुवार दि. 10 डिसेंबर 2020 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करतांना शुक्रवार दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभा निवडणुकीत मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply