Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बाजार समितीत कांदा विक्रीसाठी वाहनांच्या एक किलोमीटर पर्यंत रांगा

पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक

पारनेर । वीरभूमी - Dec 15, 2020 • 12:00 AM 1295 views
पारनेर कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दुपारी एक ते रात्री अकरा वाजेपर्यंत विक्रमी कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याचा लिलाव हा बुधवारी होणार आहे. पारनेर बाजार समितीत कांदा लिलाव आठवड्यातील रविवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी होतो. रविवारी पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 3500 ते 4000 रूपये भाव मिळाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण होते.

पारनेरमध्ये नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने शेतकरी आपला जुना व नवीन कांदा विक्रीसाठी पारनेर बाजार समितीत घेऊन येत आहे. त्यातच रविवारी झालेल्या कांदा लिलावात शेतकर्‍यांच्या कांदा पिकाला चांगला भाव मिळाला होता. यामुळे कांदा उत्पाकांनी आपला कांदा विक्रीसाठी पारनेर बाजार समितीतच आणण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी दुपारपासून हजारो वाहनांच्या साह्याने पारनेर बाजार समितीमध्ये कांदा आवक झाली आहे.

संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत बाजार समिती ते मुख्य रस्त्यांवर एक किलोमीटरपर्यंत कांदा वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पारनेर शहरातील रस्त्यांवर रात्रीच्यावेळीही वाहनाच्या रांगा दिसत होत्या.

पारनेर शहरातील वाहतुक कोंडी झाल्याने पारनेर पोलीसांनी बस स्टँडवर वाहणे वळवून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीत एकाच वेळी वाहनांची संख्य़ा वाढल्याने प्रभारी सचिव शिवाजी पानसरे व कर्मचारी वाहन चालकांना मार्गदर्शन करीत होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply