Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

चार जिल्ह्यातील 11 जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या ठार

शार्पशुटर पथकाने बिबटरगावमध्ये केली कारवाई

अहमदनगर । वीरभूमी - Dec 18, 2020 • 12:00 AM 2544 views
गेल्या दोन महिण्यांपासून अहमदनगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड व सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 11 जणांचा बळी घेणार्‍या बिबट्याला अखेर शार्पशुटरने ठार मारले. या बिबट्याने सोलापूर जिल्ह्यातील बिबटरगावमध्ये ठार मारण्यात शुक्रवारी वनविभागाला यश आले. या बिबट्याने पैठण तालुक्यातील दोन, पाथर्डी तालुक्यात तीन, आष्टी तालुक्यात तीन तर सोलापूर जिल्ह्यात तीन अशा 11 जणांचा बळी घेतला आहे.

या नरभक्षक बिबट्याने औरंगाबाद, अहमदनगर, बीड व सोलापूर जिल्ह्यात धुमाकुळ घालत 11 जणांचा बळी घेतला होता. तर अनेकांना जखमी केले होते. या बिबट्यापासून नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी नरभक्षक बिबट्या बेशुद्ध करून पकडा, तो प्रयत्न फसल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश रविवारी (दि.6) प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिले होते. या आदेशानुसार, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 40 ट्रॅप कॅमेरे लावले होते. तसेच, तीन बेशुद्ध करण्यासाठी पथके, दोन शार्पशूटर, 5 हत्यारांसह पोलिस, नाशिक येथील दोन डॉग स्कॉड आहेत आणि थर्मल सेन्सर इमेज ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करण्यात आला होता.

यासोबतच, पुणे, जुन्नर, सोलापूर व नगर येथील वनविभाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. 17 पथकाच्या माध्यमातून नरभक्षक बिबट्याची शोध मोहिम सुरू होती. तसेच काटगाव (तुळजापूर) येथील कोळी समाजाचे 25 लोक त्यांच्याकडील 17 कुत्री घेऊन बिबट्या पकडण्याच्या मोहिमेवर होते.

मागील आठवड्यात या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी चिखलठाण येथे उसाचा फड पेटवला होता. पण, त्यातून नरभक्षक बिबट्या निसटला होता. मागील 15 दिवसांपासून त्यास गोळ्या घालण्यासाठी यंत्रणा फिरत होती. पण, चकवा देऊन बिबट्या प्रत्येक वेळेस निसटत होता.

मागील आठ दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. यातच, तो करमाळा तालुक्यातून माढा तालुक्याकडे सरकल्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू होता. पण, शुक्रवारी बिबट्या पांडुरंग राखुडे यांच्या केळीच्या फडात असल्याचे कळताच वनविभाग व शार्पशूटरने त्यास घेरले आणि शुक्रवारी (दि. 18) रोजी सव्वा सहा वाजता त्यास ठार केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply