Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार

शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष व बीएलओंना मतदान केंद्रावर निवडणुकीचे काम देऊ नये

राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शेवगाव शाखेची मागणी

शेवगाव । वीरभूमी- Dec 27, 2020 • 12:00 AM 904 views
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून आदेश देऊ नयेत तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदान केंद्रावर निवडणुकीचे काम देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक विनोद फलके, सदिच्छा मंडळाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब डमाळ, बाळकृष्ण कंठाळी, प्रकाश लबडे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नागरे आदींनी ही मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन उद्या सोमवारी (दि. 28) शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करणार्‍या प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीचे आदेश मिळाले आहेत. तसेच अनेक प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक शाखेकडून आदेश प्राप्त झाले आहेत.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी वर्षभरात अनेक वेळा मतदार नोंदणीचे काम करत असतात तसेच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गावपातळीवर मतदारांना मतदार चिक्की वाटपाचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे काम दिले जाऊ नये. तसेच ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय संवेदनशील असल्याने प्राथमिक शिक्षकां ऐवजी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष जबाबदारी द्यावी, प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रात केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आदेश द्यावेत. अशी मागणी संघटनेने केली आहे. अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. तालुक्यातील विविध संघटना व प्राथमिक शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply