Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

गावठी कट्ट्यांसह दुचाकी चोरटा जेरबंद

शेवगाव पोलिसांची कारवाई । चार दुचाकी हस्तगत

शेवगाव । वीरभूमी - Feb 03, 2021 • 12:00 AM 3311 views
शेवगाव शहर व तालुक्याची कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिव ढासळत चालली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून खून, लुटमार, चोर्‍यामध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शेवगाव पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

अशाच प्रकारे बंदोबस्तावरील पोलिसांना खानापूर-रावतळे, कुरुडगाव रोडवरील हॉटेल शिवार येथे एक आरोपी आल्याची माहिती समजताच त्याला सापळा रचुन अटक केली असता त्याकडे एक गावठी कट्टा सापडला. तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरलेल्या चार दुचाकीही त्याकडून हस्तगत केल्या आहेत.

अटक केलेल्या आरोपीचे नाव नामदेव भागवत वटाने (मुळ रा. सावळेश्वर, पोस्ट- राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड. हल्ली रा. कुरूडगाव, ता. शेवगाव) असे असून त्याकडून गावठी कट्टा व चोरीची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रभाकर पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोसई. सोपान गोरे, पोलीस अंमलदार बाबासाहेब शेळके, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, वासुदेव डमाळे, संदीप दरवडे, किशोर शिरसाठ यांनी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत खानापुर ते रावतळे, कुरूडगाव जाणारे रोडलगत असणारे हॉटेल शिवार यास चोहोबाजुने घेराव करुन सापळा रचुन अचानक छापा टाकुन नामदेव भागवत वटाने (मुळ रा. सावळेश्वर पोस्ट- राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. कुरूडगाव, ता. शेवगाव) यास गावठी कट्टा (पिस्टल) व चोरीची मोटार सायकलसह शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या विविध कंपनीच्या चार मोटार सायकल त्याचेकडुन हस्तगत केल्या आहेत.

सदर आरोपीविरूध्द पोलीस अंमलदार वासुदेव डमाळे यांचे फिर्यादीवरून गु.र.नं. 55/2021 भा.दं.वि.सं.कलम 379 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई. एस. आर. गोरे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply