Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी यांची नियुक्ती

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी यांची नियुक्ती

अहमदनगर । वीरभूमी - Feb 27, 2021 • 12:00 AM 1317 views
भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि.अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) डॉ.प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के.पी. विश्वनाथ यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार ४ नोव्हेंबर २०२० पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.

भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.ए.के.सिंह व राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे सदर समितीचे सदस्य होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply