Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अज्ञातांकडून गव्हाच्या पेंढ्यांची राखरांगोळी

बालमटाकळीतील घटना । जळालेल्या पेंढ्याचा ढिगारा पाहून शेतकर्‍यांचे अश्रू अनावर

बोधेगाव । वीरभूमी - Mar 17, 2021 • 12:00 AM 815 views
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांच्या शेवगाव-गेवराई महामार्गलगतच असणार्‍या स्वतःच्या मालकीच्या गट नंबर 196/1/1 मधील अंदाजे आर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील काढणी करून शेतात पसरलेल्या अवस्थेतील गव्हाच्या पेंढ्या एका जागेवर जमा करून तो ढिगारा रात्रीच काही अज्ञात इसमांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा दि. 16 मार्च रोजी मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे.

सदरील घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांची तीन एकर शेतजमीन बालमटाकळी शिवारात शेवगाव-गेवराई महामार्गालगतच असून सदरील जमीन ही कसण्यासाठी (बटाईने) बालमटाकळी येथील शेतकरी दिगंबर टोके यांनी केलेली आहे.

तसेच टोके यांनी या जमिनीवर उत्तम प्रकारे गव्हाचे पीक पोटच्या मुलासारखे तसेच तळ हाताच्या फोडाप्रमाणे तीन ते चार महिने रात्रंदिवस राब, राब काबाड कष्ट करून, उसनवारी पैसे गोळा करून खत, पाणी घालून जगविलेले गव्हाचे पीक हे स्वतःच्या डोळ्याने सकाळी जळालेल्या अवस्थेत पाहिले. त्यांचे या घटनेने फार आतोनात नुकसान झाले आहे. पेटवून दिलेले गव्हाचे ढिगारे पाहून टोके यांचे अश्रू अनावर झाले.

सदरील घटनेची माहिती समजताच शेतकरी दिगंबर टोके यांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्र तसेच महसूल आणि कृषी विभागाला कळवली असून घटनास्थळी बोधेगाव दुरक्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा पवार यांनी भेट दिली. तसेच महसूल विभागाचे कोतवाल रामजी भोंगळे व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक भीमराव काटकर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन घटनेची रीतसर पाहणी केली.

शेतकर्‍याचा गहु जळाल्याने मोठे नुकसान झाले असून संबधित शेतकर्‍याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply