Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जेंव्हा समुद्रातही ट्राफिक जॅम होते

सुएझच्या कालव्यात मालवाहतूक जहाज अडकले

वीरभूमी । ऑनलाईन Mar 24, 2021 • 12:00 AM 1336 views
आपण सर्वांनी रस्त्यावरील ट्राफिक जॅमचा अनुभव कधी ना कधी घेतला आहे. घाईच्या कामात नक्कीच ट्राफिक जॅमचा प्रत्येकाला आलेलाच असतो. मात्र समुद्रातही ट्राफिक जॅम झाले आहे.

कारण सुएझच्या कालव्यात चीनहून मालवाहतूक करणारे एक महाकाय कंटनेर जहाज अडकले आहे. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जॅम झाले आहे. सुएझ कालवा 193.3 किमी लांबीचा असून भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला हा कालवा जोडतो. अडकलेल्या जहाजावर पनामा देशाचा झेंडा लावलेला आहे.

मंगळवारी सकाळी सुएझच्या कालव्यातून जाताना नियंत्रण गमावल्याने 400 मीटर लांब आणि 59 मीटर रुंद असणारे हे महाकाय जहाज अडकले. मालवाहतूक करणार्‍या जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टग बोट्स (जहाजांना धक्का देणार्‍या शक्तिशाली जहाज) तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील हे जहाज तेथून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

हे मालवाहतूक करणारे जहाज अडकल्यानंतर लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनारी मोठ्या संख्येने जहाज उभे आहेत. या कालव्याच्या माध्यमातून दररोज हजारो जहाद आशिया-युरोप दरम्यान प्रवास करत असतात. सुएझ कालव्यातील हा मार्ग आणखी काही काळ बंद राहिल्यास जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपमध्ये जावे लागणार आहे.

पनामाचे हा कंटेनर चीनहून नेदरलँड्समधील रॉटरडॅम बंदरावर जात होते. या दरम्यान त्याने हिंदी महासागरातून युरोपमध्ये जाण्यासाठी सुएझ कालव्याचा रस्ता वापरला. मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 7.40 वाजता सुएझ कालव्याच्या उत्तर भागात अडकला. हे जहाज 2018 मध्ये तयार करण्यात आले होते. तैवानची ट्रान्सपोर्ट कंपनी एव्हरग्रीन मरीन या जहाजाला संचलित करत असल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तानुसार, एव्हर गिवेन या जहाजाच्या चालकांनी सांगितले की, सुएझ कालवा पार करत असताना एक वादळ आले. त्यामुळे जहाजाची दिशा बदलली. जहाजाची दिशा पूर्वपदावर करण्या प्रयत्न करण्यात येत असताना जहाज एका ठिकाणी अडकले. या जहाजामागे आणखी एक मालवाहतूक करणारे जहाज अडकले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply