Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून राम शिंदेंच्या नावाची चर्चा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून राम शिंदेंच्या नावाची चर्चा

पंढरपूर । वीरभूमी- Mar 24, 2021 • 12:00 AM 3806 views
पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. काल मंगळवार दि. 23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र भाजपाकडून नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगु लागली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उशीर का केला जातोय? असा सवालही आता विचारला जात आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेतली. मात्र, त्यावेळी उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी भालके कुटुंबातील उमेदवार जाहीर करण्यास होत असलेला उशीर म्हणजे पार्थ पवार यांच्यासाठी वातावरण निर्मिती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

तर दुसरीकडे भाजपचा उमेदवारही अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप प्रभारींनी बैठक घेत उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं. भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असं असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले प्रा. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे.

पंढरपूर-मंगळवेठा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.

भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबाला उमेदवारी टाळत पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली, तर भगिरथ भालके हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेठा मतदारसंघाची पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply