Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

असा मिळवा घरगुती गॅस सिलेंडर 119 रुपयांना

असा मिळवा घरगुती गॅस सिलेंडर 119 रुपयांना

नवी दिल्ली- Mar 27, 2021 • 12:00 AM 3629 views
महागाईने प्रत्येकजन आज हातघाईला आहे. मात्र महागाईने त्रस्त असलेल्यांना दिलासा देण्यासाठी पे-टीएम (Paytm) अ‍ॅपने एक कॅश बॅक ऑफर आणली आहे.

यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर तुम्हाला तब्बल 700 रुपयाचा कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा फायदा घेऊन 819 रुपयाला मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर 119 रुपयाला खरेदी करू शकता.

सध्या सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळला आहे. या महागाईमुळे 2021 मध्ये अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे. यामुळे दिल्ली मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र पे-टीएमने (Paytm) तुमच्यासाठी एक खास कॅश बॅक ऑफर आणली आहे.

या ऑफरमध्ये तुम्ही पे-टीएमवर (Paytm) तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करून 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. यामुळे अनुदानित असणारा 819 रुपयांचा गॅस सिलेंडर 119 रुपयांना खरेदी करू शकता.

या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपल्या फोनमध्ये पेटीएम (Paytm) अ‍ॅप नसेल तर डाऊनलोड करुन घ्यावा. त्यानंतर पेटीएम वर जावून ‘शो’ (Show more) वर क्लिक करावे लागेल. आता ‘recharge and pay bills’ वर जावे. त्यानंतर आता ‘बुक सिलेंडर’ पर्याय उघडावा. यामध्ये भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन ऑप्शनमधून आपला गॅस निवडावा.

त्यानंतर आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी तेथे भरा. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. आता देय देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरवर ठेवून गॅस सिलेंडर खरेदी करा.

ही ऑफर पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणार्‍या ग्राहकांना 700 रुपयांपर्यंतचा हा कॅशबॅक मिळू शकेल. ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 पर्यंतच असणार आहे. म्हणजेच, स्वस्त एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागणार आहे.

अशा पद्धतीने आपण घरगुती गॅस सिलेंडर खरेदीवर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवून फायदा करून घेऊ शकता.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply