Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आमचं काही ठरलं तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल

भाजपाच्या मोठ्या नेत्याचे शरद पवार- अमित शहा भेटीवर सुचक वक्तव्य

पुणे: Mar 29, 2021 • 12:00 AM 1902 views
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या वृत्ताने राज्यात राजकारणात बोंबाबोंब झाल्यानंतर राजकीय नेते आपआपली मते मांडायला लागली आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रीया देतांना म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादीचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना शरद पवार आणि अमित शाह यांच्या 26 मार्चला अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, असे म्हटले. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मात्र, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात नक्की भेट झाली का, हे मला माहिती नाही. पण अमित शाह यांनी काल केलेलं वक्तव्य पाहता ही भेट झाली असावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशी भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे.

यामुळे उलट शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली हीच गोष्ट शिक्कामोर्तब होत आहे. महाविकासआघाडीचे नेते वारंवार सरकारला धोका नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेच सिद्ध होत असल्याचा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आमच्या नेत्यांची विचारांवर सर्वोच्च निष्ठा आहे. त्यामुळे तो सांगतील तो निर्णयच आमच्यासाठी अंतिम असेल, अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी जोडली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply