Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई । वीरभूमी- Apr 11, 2021 • 12:00 AM 2295 views
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या पित्ताशयावर उद्या शस्त्रक्रिया होणार असल्याने ते आज रुग्णांलयात दाखल झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यावेळी 7 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

शरद पवार यांना 3 एप्रिल रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यावेळी त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवार यांच्यावर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 30 मार्च रोजी पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे.

दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती.

शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. ज्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे उद्या शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. त्यामुळे लगेच काही चाचण्या केल्यानंतर पित्तशयातील तो खडा दुर्बिणीद्वारे काढण्यात आला. या शस्त्रक्रियेला अर्धा तास लागला, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली होती.

दरम्यान, या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल असं देखील मायदेव यांनी सांगितलं होतं.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply