Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अहमदनगर कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

कोरोना बाधितांचे रेकॉर्ड; आज आढळले 2654

अहमदनगर । वीरभूमी - Apr 13, 2021 • 12:00 AM 3253 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आज जिल्ह्यात तब्बल 2654 कोरोना बाधित आढळून आले. यामुळे अहमदनगर जिल्हा कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जावून पोहोचला आहे.

दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी या वर्षीचे नव्याने रेकॉर्ड झाले आहे. कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजाराच्या पार गेला असून नगर शहरासह पाच ठिकाणची आकडेवारी दोनशेच्या पुढे आहे तर आठ ठिकाणची आकडेवारी शंभरच्या पुढे आहे.

आज मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत 2654 ने भर पडली आहे. काल सोमवारी जिल्ह्यातील 1842 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

आज मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 651, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 582 आणि अँटीजेन चाचणीत 1421 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 118, कोपरगाव 09, संगमनेर 98, राहाता 30, श्रीरामपूर 36, कर्जत 44, राहुरी 11, अकोले 72, श्रीगोंदा 28, पारनेर 45, नेवासा 07, पाथर्डी 36, नगर ग्रामीण 30, शेवगाव 28, भिंगार कन्टेंमेंट 30, जामखेड 19, इतर जिल्हा 03, मिलट्री हॉस्पिटल 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 298, कोपरगाव 10, संगमनेर 30, राहाता 81, श्रीरामपूर 25, कर्जत 06, राहुरी 14, अकोले 05, श्रीगोंदा 11, पारनेर 04, नेवासा 19, पाथर्डी 03, नगर ग्रामीण 35, शेवगाव 02, भिंगार कन्टेंमेंट 27, जामखेड 05, इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1421 जण बाधित आढळून आले. मनपा 60, कोपरगाव 275, संगमनेर 91, राहाता 104, श्रीरामपूर 139, कर्जत 112, राहुरी 126, अकोले 68, श्रीगोंदा 85, पारनेर 70, नेवासा 88, पाथर्डी 75, नगर ग्रामीण 40, शेवगाव 62, भिंगार कन्टेंमेंट 14, जामखेड 09, इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तर काल सोमवारी 1842 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 666, अकोले 69, जामखेड 23, कर्जत 33, कोपरगाव 109, नगर ग्रामीण 129, नेवासा 54, पारनेर 61, पाथर्डी 59, राहाता 141, राहुरी 64, संगमनेर 113, शेवगाव 94, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 150, कॅन्टोन्मेंट 25, मिलिटरी हॉस्पिटल 04 आणि इतर जिल्हा 23 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply