Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

यावर्षी मुबलक पाऊस; पिके देखील चांगली येणार

संत सदगुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरीतील भाकीत

कर्जत । वीरभूमी- Apr 13, 2021 • 12:00 AM 2344 views
यावर्षी सर्वत्र मुबलक पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहेत. मात्र यावर्षी देखील आरोग्याचा प्रश्न जनतेला भेडसावणार आहे. आखाती देशांमध्ये युद्ध होऊन नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये येणार असून याचा जगभरातील जनतेला व राजाला त्रास होणार आहे. असे भाकीत कर्जत येथील श्रीसंत सदगुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरी मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गोदड महाराज यांच्या संवत्सरीचे वाचन करण्यात येते. यंदा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थित वाचन पार पडले.

कर्जत येथील थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षाची संवत्सरी लिहून ठेवली आहे. यामध्ये पिकपाणी याचप्रमाणे राजकारण संकटे नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत करून ठेवले आहे. याचे वाचन दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी मंदिरांमध्ये करण्यात येते.

गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे व अनिल महाराज काकडे यांनी या संवत्सरी चे वाचन आज केले. दरवर्षी हे भाकीत ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात परंतु या वर्षी देखील कोरोनामुळे भाविकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. यामुळे मंदिरात मध्ये मोजक्या पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत वाचन करण्यात आले.

वर्षभर शेतकरी आणि नागरिक भाविक या भाकितांची वाट पाहत असतात. यावर्षी प्लवंग संवतसरी ते असून याचा स्वामी नळ आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहेत. मात्र आखाती देशांमध्ये यावेळी आगी लागण्याच्या घटना घडणार आहेत.

याशिवाय पश्चिम विभागामध्ये चक्रीवादळाचा धोका संभवणार आहे. यामुळे अराजकता माजणार असून आखाती राष्ट्रांमध्ये पुन्हा युद्ध भडकून याचा त्रास राजा आणि जनतेला होणार आहे. यावर्षीदेखील आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा राहणार आहे असे या भागांमध्ये सांगण्यात आले असून हे भाकीत संपूर्ण जगाच्या बाबतीत वर्तविण्यात येते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply