Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बोधेगावातही मिळणार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार

बोधेगावातही मिळणार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार

बोधेगाव । उद्धव देशमुख- Apr 16, 2021 • 12:00 AM 887 views
शेवगाव तालुक्यात वाढत चाललेला कोरोना आणि होत असलेली सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट पाहाता तालुक्याच्या पुर्व भागातील कोरोना बाधित नागरिकांना बोधेगावमध्येच उपचार मिळावे, त्यांना उपचारासाठी दारोदार फिरण्याची वेळ येऊ नये म्हणुन बोधेगाव येथे खाजगी सेवा करणार्‍या डॉक्टरांनी एकत्र येत बोधेगाव येथे ‘बोधेश्वर कोविड सेंटर’ उभारले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन शनिवार दि. 17 रोजी होणार आहे.

आज सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजवला असताना कोरोना बाधित रुग्णांना सहजासहजी बेड देखील उपलब्ध होत नाहीत. प्रत्येकजन ऑक्सिजन बेड आणि रेमडिसीवीर इंजेक्शनसाठी धावाधाव करताना दिसत आहे.

सगळी परिस्थिती भयानक होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणुस मात्र सगळीकडेच निराशेच्या खोल गर्तेत जाताना दिसत आहे.

त्यांना आधार, साथ व दिलासा मिळावा व त्यांना वेळेत योग्य उपचार मिळावेत म्हणून बोधेगाव येथील डॉ. प्रमोद जाधव, राजेंद्र कणसे, मनोज पारिख, अरुण भिसे, चंद्रशेखर घनवट, अजय कुलकर्णी, परमेश्वर गलांडे, निलेश मंत्री, दिपक फुंदे, दिपक जैन, ज्ञानेश्वर देशमुखसह पुंड अशा 12 डॉक्टरांनी एकत्रीत येत कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.

कोविड सेंटरमध्ये शासकीय दरापेक्षा कमी बील आकारले जाणार आहे.तसेच कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर दर तीन तसाला रुग्णांकडे जातीने लक्ष दिले जाणार असुन रात्री दोन डॉक्टर कर्तव्यावर राहणार आहेत. कोविड सेंटर मध्ये नर्स स्टाफ आणि कर्मचारी वर्ग देखील राहणार आहेत.

शासन नियमानुसार 4 हजार रुपये बेडची आकारणी आहे. परंतु बोधेश्वर कोविड सेंटर येथे अडीच हजार रुपयेच फी आकरण्यात येणार आहे. तसेच या कोविड सेंटरमध्ये 15 बेडची व्यवस्था करण्यात आली असुन यापैकी 10 बेड ऑक्सिजनचे आहेत.

रॅपिड अँटीजेन, आरटीपीसीआर आणि एचआरसीटीच्या आधारे कोविड रुग्णांना याठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply