Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आज जिल्ह्यातील 2053 कोरोना बाधितांना डिस्चार्ज तर इतक्या रुग्णांचा मृत्यू

आज जिल्ह्यातील 2053 कोरोना बाधितांना डिस्चार्ज तर इतक्या रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर । वीरभूमी - Apr 16, 2021 • 12:00 AM 1368 views
जिल्ह्यात आज 2053 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 159 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.22 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज तब्बल 40 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1441 वर पोहोचली आहे. आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 3056 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 17 हजार 657 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 835, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 525 आणि अँटीजेन चाचणीत 1696 रुग्ण बाधीत आढळले.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 514, अकोले 120, जामखेड 63, कर्जत 112, कोपरगाव 131, नगर ग्रामीण 109, नेवासा 50, पारनेर 43, पाथर्डी 144, राहाता 255, राहुरी 68, संगमनेर 156, शेवगाव 52, श्रीगोंदा 40, श्रीरामपूर 111, कॅन्टोन्मेंट 57, इतर जिल्हा 26 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, राहाता 58, नगर ग्रामीण 24, कर्जत 47, श्रीरामपूर 76, संगमनेर 71, कोपरगाव 16, नेवासा 58, शेवगाव 54, पाथर्डी 32, राहुरी 28, पारनेर 55, कॅन्टोन्मेंट बोर्ड 29, श्रीगोंदा 24, जामखेड 36, इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 215, राहाता 104, नगर ग्रामीण 27, कर्जत 05, श्रीरामपूर 12, संगमनेर 55, कोपरगाव 06, नेवासा 04, शेवगाव 05, पाथर्डी 25, राहुरी 16, पारनेर 11, अकोले 09, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15, श्रीगोंदा 03, जामखेड 03, इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1696 जण बाधित आढळून आले. मनपा 292, राहाता 123, नगर ग्रामीण 222, कर्जत 147, श्रीरामपूर 90, संगमनेर 42, कोपरगाव 144, नेवासा 93, शेवगाव 90, पाथर्डी 87, राहुरी 96, पारनेर 62, अकोले 106, कॅन्टोन्मेंट बोर्ड 47, श्रीगोंदा 34, जामखेड 07, इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकून कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 29 हजार 257 वर पोहोचली असून आतापर्यंत 1 लाख 10 हजार 159 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1441 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या 17 हजार 657 जणांवर उपचार सुरू आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply