Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

विनाकारण फिरणार्‍यांची दंडाऐवजी कोरोना चाचणी

कर्जत पोलीस आणि नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम

कर्जत । डॉ. अफरोजखान पठाण- Apr 17, 2021 • 12:00 AM 1887 views
शनिवार-रविवार विकेंड लॉकडाऊन असताना कर्जत शहरात विनाकारण फिरताना आढळणार्‍या व्यक्तींना कोणताही दंड न करता थेट त्यांची कोव्हीड अँटीजन चाचणी करण्याचा अभिनव उपक्रम कर्जत पोलीस प्रशासन आणि कर्जत नगरपंचायतीने राबविला.

या उपक्रमामुळे काही काळ का होईना विनाकारण फिरणार्‍या व्यक्तींनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आज पहायला मिळाले.

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि. 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आडवड्याचा शनिवार आणि रविवार हा विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दोन दिवसात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल यांनाच वगळण्यात आले आहे.

शनिवार, दि. 17 रोजी विकेंड लॉकडाऊन असताना कर्जत शहरात विनाकारण बाहेर पडणार्‍या व्यक्तींना कर्जत पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अडवत त्यांना दंड न करता त्यांची प्रत्यक्ष जागीच अँटीजन कोरोना चाचणी घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला.

यावेळी विनाकारण फिरणार्‍या व्यक्तींनी अचानक घेतलेल्या प्रशासनाच्या या उपक्रमाचा चांगलाच धसका घेतला होता.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांनी घरी राहणे आवश्यक आहे. मात्र काही नागरिक विनाकारण शहर आणि गावात फिरताना दिसत असल्याने त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्यांची अँटीजन चाचणी घेण्याचा फंडा पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने वापरला आहे. निश्चित या उपक्रमाचा फायदा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगर पालिका आरोग्य विभागाचे सागर भांडवलकर, पोकॉ. बळीराम काकडे, संतोष जसाभाटी, बाळासाहेब यादव, नितीन नरुटे, वसंत साठे, संतोष समुद्र, उमेश गलांडे, अशोक मोहोळकर, राकेश गदादे, आबा नेवसे, विलास शिंदे यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्याचा उपक्रम पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतला होता. यामध्ये 25 व्यक्तीची अँटीजन चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याने त्याची रवानगी कोव्हीड सेंटरला करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

यामुळे नागरिकांनी घरी राहा - सुरक्षित राहत आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी जाधव यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply