Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना रोखण्यासाठी या तालुक्यातील किराणा असोशिएशनने घेतला महत्वाचा निर्णय

कोरोना रोखण्यासाठी या तालुक्यातील किराणा असोशिएशनने घेतला महत्वाचा निर्णय

कोपरगाव । वीरभूमी- Apr 17, 2021 • 12:00 AM 2492 views
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापार्‍यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार यापुढे शुक्रवारी दुपारी 4 वाजेपासून ते सोमवार पर्यंत दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर मंगळवार ते गुरुवार या तीन दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कोपरगाव किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी वीरभूमीला दिली.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे अध्यक्षतेखाली समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात बैठक पार पडली.

या बैठकीस कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे कलविंदर दडीयाल, भाजपचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तुषार पोटे, मनसेचे संतोष गंगवाल हे उपस्थित होते. तसेच व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायणशेठ अग्रवाल, सदस्य दिपकशेठ अग्रवाल, किरण शिरोडे उपस्थित होते.

याबाबत पुढे बोलतांना व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले की, कोपरगाव शहरातील किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयान्वये कोरोना आटोक्यात आणण्यास प्रशासनास सहकार्य करावे.

तसेच बंदच्या कालावधीमध्ये शहरातील नागरिकांना मर्यादित स्वरुपात, मर्यादित वस्तुंतर्गत जीवनावश्यक डाळ, तांदूळ, तेल, तूप, चहा, साखर, मीठ या वस्तूंची गरज भासल्यास समता पतसंस्थेने दिलेल्या 7722010222 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा. ज्यांना या वस्तू लागतील त्यांना त्या घरपोहोच देण्यात येईल. असे समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या बैठकीत झालेला हा निर्णय शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना माहिती दिली असता त्यांनी देखील या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply