Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्यात आज आढळले 3592 कोरोना बाधित

शेवगाव 153, पाथर्डी 195, कर्जत 159, राहुरी 202

अहमदनगर । वीरभूमी - Apr 18, 2021 • 12:00 AM 2912 views
कडक निर्बंध, विकेंड लॉकडाऊन नंतरही दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. आज पुन्हा एकदा कोरोना बाधित आढळण्याचे नव्याने रेकॉर्ड झाले आहे. आज रविवारी जिल्ह्यात तब्बल 3 हजार 592 कोरोना बाधित आढळले आहेत.

झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज रविवारी जिल्ह्यात 3592 कोरोना बाधित आढळले असून नागरिकांच्या बेफिकीरीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

आज रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी व खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीपेक्षा अँटीजेन चाचणीतील बाधितांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोना रोखू शकतो. यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 849 वर गेला असून नगर ग्रामीण 347, राहाता 312, संगमनेर 217, नेवासा 206, राहुरी 202, पाथर्डी 195, अकोले 189, कर्जत 159, शेवगाव 153, कोपरगाव 144, इतर जिल्हा 127, पारनेर 124, श्रीगोंदा 99, श्रीरामपूर 98, जामखेड 80, भिंगार कन्टेन्मेंट 77, मिलटरी हॉस्पिटल 12, इतर राज्य 02 असे रुग्ण आढळले आहेत.

आज शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत 3592 ने भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 713, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 967 आणि अँटीजेन चाचणीत 1912 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 176, नगर ग्रामीण 52, राहाता 21, संगमनेर 11, नेवासा 30, राहुरी 32, पाथर्डी 58, अकोले 67, कर्जत 70, शेवगाव 07, कोपरगाव 26, इतर जिल्हा 02, पारनेर 36, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 07, जामखेड 48, भिंगार कन्टेन्मेंट 28, मिलटरी हॉस्पिटल 12, इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 380, नगर ग्रामीण 68, राहाता 81, संगमनेर 135, नेवासा 09, राहुरी 13, पाथर्डी 23, अकोले 25, कर्जत 08, शेवगाव 14, कोपरगाव 21, इतर जिल्हा 94, पारनेर 15, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 22, जामखेड 03, भिंगार कन्टेन्मेंट 29, इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1912 जण बाधित आढळून आले. मनपा 293, नगर ग्रामीण 227, राहाता 210, संगमनेर 71, नेवासा 167, राहुरी 157, पाथर्डी 114, अकोले 97, कर्जत 81, शेवगाव 132, कोपरगाव 97, इतर जिल्हा 31, पारनेर 73, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 69, जामखेड 29, भिंगार कन्टेन्मेंट 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दिवसेंदिवस जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा. नियमित हात स्वच्छ धुवावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply