Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

थोरात कारखान्याचे 500 बेडचे कोविड सेंटर सज्ज

थोरात कारखान्याचे 500 बेडचे कोविड सेंटर सज्ज

संगमनेर । वीरभूमी- Apr 18, 2021 • 12:00 AM 744 views
राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात राज्य पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असून जिल्ह्यातील व तालुक्यातील कोरोना पूर्णपणे रोखण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सातत्याने सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी शासनाचा लॉकडाऊन अत्यंत कडकरीतीने पाळणे गरजेचे असून त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणार आहे.

मात्र सध्याची रुग्ण वाढ व त्यावरील उपाय योजनांमध्ये महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे नवीन 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या अमृत कलामंच येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पंचायत समिती सभापती सुनंदाताई जोर्वेकर, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, डॉ. हर्षल तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, डीवायएसपी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजकुमार जर्‍हाड, वैद्यकीय अधिकारी संदीप कचोरीया, तालुका वैद्यकिय अधिकारी सुरेश घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्याधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

या बैठकीत नामदार थोरात यांनी कारखान्याला नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नवीन नगर रोड वरील विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी कारखान्याच्या वतीने पुरुषांसाठी स्वतंत्र 300 बेड व महिलांसाठी स्वतंत्र 200 बेडचे असे एकूण 500 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू होत आहे.

ना. थोरात यांनी ही कोरोना रुग्ण वाढ रोखण्यासाठी सातत्याने प्रशासनाला मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयांमध्ये तालुकास्तरावरील राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशिन दिले असून पाच बायपप मशीनही कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने 40 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले.

तालुक्यातील आपत्तीच्या वेळी अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांनी सातत्याने मदतीची भूमिका घेतली असून मागील वर्षी कोरोना संकटात विविध ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरू केले होते. याचबरोबर मोफत अन्नछत्र ही सुरू केले होते. सध्याचा वाढता कोरनाचा प्रादुर्भाव पाहतात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानास नामदार बाळासाहेब थोरात यांनी 500 बेडचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

यानुसार अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तातडीने नवीन रोडवरील विघ्नहर्ता पॅलेस याठिकाणी कोविड केअर सेंटरसाठी अद्ययावत सुविधा देण्याच्या कामास सुरुवात केली आहे. हे कोवीड केअर सेंटर तातडीने सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे.

यावेळी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, 30 एप्रिल पर्यंत सर्वांनी अत्यंत कडक पद्धतीने लॉगडाऊन पाळला तर कोरोनाचा प्रादुर्भाव आपण करू कमी करू शकतो. तालुका कोरोना मुक्तीकडे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त बाळगणे बरोबर प्रशासनानेही कडक शिस्त लावावी, असे आवाहन केले आहे.

कारखान्याच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हे कोरोना सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी कारखान्याच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply