Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगावात लोकनेते मारुतराव घुले कोविड सेंटरचे उद्घाटन

शेवगावात लोकनेते मारुतराव घुले कोविड सेंटरचे उद्घाटन

शेवगाव । वीरभूमी - Apr 21, 2021 • 12:00 AM 3166 views
वाढती कोरोना बाधितांची संख्या व अपुर्‍या पडणार्‍या आरोग्य सुविधा यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून शहरातील स्व. मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज बुधवार दि. 21 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

शेवगाव शहर व तालुक्यात खाजगी सात व शासकीय तीन कोविड सेंटर कार्यरत आहेत. आता माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून शेवगाव शहरातील स्व. मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात 100 खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

दोन दिवसापुर्वी ज्ञानेश्वरचे अध्यक्ष माजी आ. नरेंद पाटील घुले यांनी कोविड सेंटरच्या जागेची पाहणी करून काही सुचना केल्या होत्या. कोविड सेंटरची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर आज बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी सलमा हिराणी, वैद्यकीय अधिक्षक रामेश्वर काटे, विस्ताराधिकारी शैलेजा राऊळ उपस्थित होते.

तसेच बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. अनिल मडके, संचालक तथा युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, संचालक संजय फडके, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, कमलेश लांडगे, वहाब शेख, समीर शेख, संतोष जाधव, अभिजीत आरेकर, मेघा कांबळे आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राजश्रीताई घुले म्हणाल्या की, दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव पाहता प्रत्येकाने काळजी घ्यावी. नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे.

प्रत्येकाने काळजी घेतली तर कोरोनाला आपण रोखू शकू. नागरिकांच्या सुविधेसाठी हे कोरोना सेंटर सुरू केले असून प्रत्येकाने सहकार्य करा, असे आवाहन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply