Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अमरापूर येथे जनशक्ती कोविड सेंटरचे उद्घाटन

अमरापूर येथे जनशक्ती कोविड सेंटरचे उद्घाटन

शेवगाव । वीरभूमी- Apr 21, 2021 • 12:00 AM 1171 views
संकटात जात, धर्म सोडून गोरगरिबांची व मानवतेची सेवा करा, ही कॉ. आबासाहेब काकडे यांची शिकवण व आम्हास मिळालेला वारसा आजपर्यंत सामाजिक भावनेतून जपला आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कॉ. आबासाहेबांनी स्थापन केलेल्या अमरापूर येथील हायस्कूलच्या इमारतीत ‘जनशक्ती कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले.

जनशक्ती कोविड सेंटरचे उद्घाटन अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, डॉ. श्वेता फलके व डॉ. अरविंद पोटफोडे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, जनशक्तीचे शहराध्यक्ष सुनिल काकडे, सुरेशनाना चौधरी, राजेंद्र पोटफोडे, प्राचार्य आर. एन. मगर, सरपंच विजय पोटफोडे, म्हतारदेव आव्हाड, भारत भालेराव, शिवाजी कणसे, शिवाजी औटी, रज्जाक भाई शेख, विष्णू दिवटे, राजेंद्र फलके, अशोक दातीर, अर्जुन पठाडे, शहादेव वाकडे, शेषेराव फलके आदि प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे म्हणाले की, जागतिक महामारीचे संकट सध्या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगावर आहे. अशा या संकटामध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अमरापूर सारख्या ठिकाणी डॉ. अरविंद पोटफोडे यांचे कार्य अमूल्य आहे. आपण जनतेचे काही देेण लागतो. जनसेवा हा मानवतेचा धर्म आहे, या भावनेतून सर्वांनी काम केले पाहिजे.

आज कोविड रुग्णांसाठी अमरापूर येथे सेंटर सुरु केले आहे. संस्थेचे सर्व कर्मचार्‍यांनी वर्गणी करून रुग्णांच्या दोन्ही वेळची जेवणाची नाश्त्तासह सर्व सुविधांची व्यवस्था केली आहे. अमरापूर ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य यांचेही या कार्याला मोठे सहकार्य लाभते आहे. भविष्यातही जनतेसाठी संस्थेची इमारत न इमारत खुली करून देणार. एकाही रुग्णांना बेड कमी पडू देणार नाही. असेही ते बोलताना म्हणाले. सोशल डिस्टंगसिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.

डॉ.पोटफोडे म्हणाले की, हा कालावधी खूपच भयानक आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात बरे करणे हेच माझे ध्येय आहे. या सेंटरच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे. डॉ. विजय फलके व डॉ. श्वेता फलके यांचेही वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभत आहे.

या कोविड सेंटरसाठी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply