Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

आज नगर जिल्ह्यातील डिस्चार्ज रुग्णही तीन हजारी पार

आज नगर जिल्ह्यातील डिस्चार्ज रुग्णही तीन हजारी पार

अहमदनगर । वीरभूमी- Apr 23, 2021 • 12:00 AM 1239 views
जिल्ह्यात आज शुक्रवारी 3790 कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी तब्बल 3023 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 27 हजार 713 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात कालच्या पेक्षा घट होऊन ते आता 83.89 टक्के इतके झाले आहे. यामुळे सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 22 हजार 802 इतकी झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 718, अकोले 113, जामखेड 46, कर्जत 199, कोपरगाव 166, नगर ग्रामीण 271, नेवासा 151, पारनेर 126, पाथर्डी 141, राहाता 284, राहुरी 136, संगमनेर 167, शेवगाव 149, श्रीगोंदा 61, श्रीरामपूर 177, कॅन्टोन्मेंट 90 आणि इतर जिल्हा 28 अशा रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या तब्बल 1 लाख 27 हजार 713 वर पोहोचली आहे. तर सध्या 22 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 1721 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

नागरिकांनी कोरोना विषयी असलेली भिती दूर करून धाडसाने उपचार करून घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो हे या आकडेवारेतून समोर आले आहे.

यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घ्यावेत, नियमित मास्क वापरावा व शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply