Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

निरर्थक वाद टाळून कोरोनाचा एकजुटीने सामना करावा

माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे आवाहन

अकोले । वीरभूमी- Apr 23, 2021 • 12:00 AM 870 views
अकोले तालुक्याची सध्याच्या कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह असून या काळात लोकांना आधाराची, मदतीची गरज आहे. या कठीण परिस्थितीत संगमनेर -अकोले असा वाद न करता व चुकीची प्रथा न पाडता सर्वांनी एकजुटीने याचा सामना करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच यातून मार्ग काढण्याऐवजी भांडत आहेत. हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले आहे.

माजीमंत्री मधुकरराव पिचड हे आपल्या राजूर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला अकोलेकरांनी मोठ्या धिराने तोंड दिले. सर्व नियमांचे कोटेकोर पालन केले. त्यानंतर आता करोनाची दुसरी लाट आली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट फार गंभीर आहे. सध्या गुणाकाराने वाढणारा संसर्ग आपल्या सर्वांना मोठ्या धैर्याने- आत्मविश्वासाने थोपवायचा आहे. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. कोरोनाला नकारात्मक दृष्टीने न बघता व गांभीर्याने घेवून छोटी - छोटी वाटणारी लक्षणे तातडीने डॉक्टरांना दाखवा व त्यांचा सल्ला घ्या. वयोवृध्द व ज्यांना जुने आजार आहेत अशांनी कोरोना जास्त गांभीर्याने घ्यावा. अशा व्यक्तींच्या घरातल्या मंडळीनीही त्यांच्याकडे जास्त लक्ष्य दयावे.

या महामारीच्या काळात जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा, सोशल मीडियावर पोस्ट करतांना खुप विचारांती पोस्ट करावी. जेणे करुन त्यातून भिती निर्माण होणार नाही. रुग्णांना समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा, आधार मिळेल असेच आपले वागणे असले पाहिजे.

अकोले तालुका हा अत्यंत संवेदनशील असून संकटकाळी सर्वजण एकत्र येवून लढाई करतात, ही अकोले तालुक्याची परंपरा आहे. आजही आणीबाणीची वेळ असून या संकटात तालुक्यातील प्रत्येक माणसाने या महामारीत प्रत्येकाला मदत करा, कोरोनाकडे अस्पृश्य भावनेने न पहाता त्याला सर्वांनी नियमांचे पालन करुन थोपवा, परतवून लावा, असे सांगितले.

कोरोनाची अकोुे तालुक्यातील स्थिती भयावह असून रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडिसीवीरसाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. आपल्या जवळच्या अनेक माणसांना कोरोनाने गाठले अन् आपल्यातून नेलेही. हे सर्व मला मनाला वेदना देणारे आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे, त्यांची दुख:, सुख हे माझं आहे.

40 वर्षांपूर्वीच्या अकोल्यात आदिवासी भागात एखादा आजारी पडला तर त्याला डोली करुन दवखान्यात घेऊन जावे लागत असे. त्या काळात रस्ते, पूल, दळणवळणाची साधने नव्हती. आज या सर्व सुविधा असून चार मोठी ग्रामीण रुग्णालये, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र, 80 आरोग्य उपकेंद्र निर्माण केली आहेत. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकुल परिस्थिती होती. पण अकोल्याची जनताजनार्दन माझ्या बरोबर होती. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने तालुक्यावर येणार्‍या प्रत्येक संकटाला परतवून लावू शकलो. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाट्याला आला, परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करीत राहिलो.

आजही वयाच्या 80 व्या वर्षी लोकांसाठी काम करण्याची उर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबरच स्वकीयांनीही आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही. कारण तुम्ही माझ्या सोबत होता, लोक हीच आपली ऊर्जा आहे. घाबरु नका, येणार्‍या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सकारात्मक विचार करा, खंबीर रहा. विशेष करुन तरुणांनी संयम ठेवा. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा.

प्रशासनाने या काळात तटस्थपणे काम करणे अपेक्षित आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून रहावे. हलगर्जीपणा करु नये. जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा. त्याचे प्रभावी असे नियोजन करा. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा अपेक्षित आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्णांना वेगळे ठेवून ही साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावे. लोकांनीही प्रशासनाला मदत- सहकार्य करणे आवश्यक असून गर्दी करु नये.

आपल्या पातळीवर जेवढे शक्य आहे, तेवढे प्रयत्न आपण करीत असून अगस्ति आश्रम येथे अगस्ति साखर कारखान्याच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु केले असून राजूर येथेही वैभवभाऊंनी कोविड सेंटर सुरु केले आहे. व्यक्तीगत पातळीवरही पिचड कुंटुंबिय रुग्णांना आवश्यक तेवढी मदत करीत असून आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहू. दुर्देवाने ज्यांच्यावर ही जबाबदारी जनतेने टाकली आहे, तेच ऐकमेकांबरोबर भांडत बसले असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. ज्यांच्यावर यांचा दबाव असायला हवा ते प्रशासन यांना जुमानत नाही. असे चित्र एकीकडे असून दुसरीकडे जनता कोरोना महामारीत होरपळत आहे. कोरोनाचे राजकारण करु नका. जनतेला मदतीचा हात द्या. असेही आवाहन करीत आपण राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना एक पत्रही लिहून कळवले असल्याचे पिचड यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा 2 मे रोजी स्मृतिदिन असून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जेलमध्ये कोणताही कार्यक्रम होणार नाही. तसेच सर्वांनी आपल्या घरातच साध्या पध्दतीने हा स्मृतिदिन साजरा करावा. कोणताही सार्वजनिक समारंभ करू नये, असे आवाहनही माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply