Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पीएम किसान लाभार्थ्यांना मिळणार 36 हजार रुपये

पीएम किसान लाभार्थ्यांना मिळणार 36 हजार रुपये

नवी दिल्ली - Apr 25, 2021 • 12:00 AM 4000 views
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभधारक असणार्‍या शेतकर्‍यांना वर्षाकाठी 36 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी मोदी सरकार देत आहे. मोदी सरकारकडून तुम्हाला ही रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत मिळत आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आतापर्यंत या योजनेमध्ये 11 कोटी 71 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेसाठी शेतकर्‍यांना कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. तसेच त्यात सहभागी झाल्यावर शेतकर्‍याला खिशातून कोणतेही पैसे न देता 36 हजार रुपये मिळविण्यास पात्र असू शकता.

अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना दरमहा पीएम किसान योजनेंतर्गत दरमहा पेन्शन देण्याची योजना असून, त्यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये किंवा 36 हजार रुपये वार्षिक पेन्शन देण्यात येते. पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणार्‍या लाभामध्ये थेट हातभार लावण्यासाठी पर्याय निवडण्याची सुविधा आहे. अशा प्रकारे शेतकर्‍याला खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचे प्रीमियम 6000 रुपयांमधून वजा केले जाईल. म्हणजेच खिशातून पैसे न घालताही शेतकर्‍याला वार्षिक 36 हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही, कारण अशा शेतकर्‍यांची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे जमा आहेत. या नोनदणीसाठी संबधित शेतकर्‍याला आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जावून नोंदणी करावी लागेल.

नोंदणीसाठी आधार कार्ड आणि सातबारा उतार्‍याची प्रत द्यावी लागेल. या नोंदणीसाठी 2 छायाचित्रे आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी शेतकर्‍याला स्वतंत्र फी भरावी लागणार नाही. नोंदणी झाल्यानंतर लाभधारक शेतकर्‍याचा विशिष्ट पेन्शन क्रमांक व पेन्शन कार्ड तयार केले जाणार आहे.

या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकेल. मात्र यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रावर शेतजमीन असावी लागणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आपणास कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे दरमहा 55 रुपये पासून ते 200 रुपयांपर्यंत हप्ता भरावा लागेल. या योजनेमध्ये आपण वयाच्या 18 व्या वर्षी सामील असाल तर मासिक अंशदान दरमहा 55 रुपये असणार आहे. वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही या योजनेत सामील झाला असाल तर तुम्हाला 110 रुपये जमा करावे लागतील. तसेच वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही सामील होत असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांनी https://maandhan.in/ या संकेतस्थळावर जावून नोनदणी करावी लागेल.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply