Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

दिलासादायक ः जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या घटली

दिलासादायक ः जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या घटली

अहमदनगर । वीरभूमी- Apr 25, 2021 • 12:00 AM 1980 views
जिल्ह्यात आज रविवारी 3493 कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी तब्बल 3553 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

प्रथमच आज आढळलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची जास्त असल्याने अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांनीही नव्याने रेकॉर्ड केले आहे. तर गेल्या चोवीस तासात तब्बल 39 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 34 हजार 491 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात कालच्या पेक्षा वाढले आहे. ते आता 84.32 टक्के इतके झाले आहे. यामुळे सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 23 हजार 203 इतकी झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 836, अकोले 188, जामखेड 79, कर्जत 158, कोपरगाव 143, नगर ग्रामीण 340, नेवासा 204, पारनेर 124, पाथर्डी 193, राहाता 311, राहुरी 199, संगमनेर 217, शेवगाव 152, श्रीगोंदा 98, श्रीरामपूर 97, कॅन्टोन्मेंट 74, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 126 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या तब्बल 1 लाख 34 हजार 491 वर पोहोचली आहे. तर सध्या 23 हजार 203 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या चोवीस तासात 39 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आज पर्यंत 1815 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

नागरिकांनी कोरोना विषयी असलेली भिती दूर करून धाडसाने उपचार करून घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो हे या आकडेवारेतून समोर आले आहे.

यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घ्यावेत, नियमित मास्क वापरावा व शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply