Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बाबानों घरातच थांबा

नगर जिल्ह्यातील या सरपंचाचे पारावर बसणार्‍या लोकांपुढे लोटांगण

अहमदनगर । वीरभूमी- Apr 25, 2021 • 12:00 AM 2447 views
संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग तीव्र वाढत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला. मात्र यानंतरही ग्रामीण भागातील नागरिक बेफिकीरपणे वागत आहेत. आजही ग्रामीण भागातील लोक बिनदिक्कतपणे घराबाहेर पडून दररोजची कामे पार पाडत आहेत.

काहीजण तर सकाळीच उठून गावाच्या पारावर येऊन बसणे, दिवसभर गावातील झाडाखाली येवून बसणे असे करतात. एवढेच नव्हे तर तोंडाला मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टन्स पाळत नाही. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी सुचना देऊन घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र ग्रामस्थ घरात थांबण्याचे नाव घेत नसल्याने जिल्ह्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी चक्क अशा लोकांसमोर लोटांगण घालून घरी थांबण्याची साद घातली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर बेड भेटत नाहीत. ऑक्सिजन, रेमडिसीवीर इंजेक्शन, औषधे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

असे असतांनाही कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेला कडक लॉकडाऊन पाळला जात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. सकाळ-संध्याकाळ ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने भोंग्याद्वारे घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही लोक बिनदिक्कत घराबाहेर पडतात.

एवढेच नाहीतर तोंडाला मास्क लावत नाहीत. पारावर बसतांना सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. दुकाने, व्यवहार बंद असल्याने घरात बसण्याऐवजी गावातील पारावर दिवसभर येऊन बसतात. वेळोवेळी सांगुनही नियम न पाळणार्‍या ग्रामस्थांसमोर कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी चक्क लोटांगण घालत बाबांनो घरातच थांबा, कोरोना साखळी तोडण्यास मदत करा, अशी विनवणी केली.

सरपंच कातोरे यांनी लोटांगण घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र यातूनतरी ग्रामस्थ बोध घेऊन कोरोना साखळी तोडण्यासाठीतरी घरात थांबतील का? असा प्रश्न निरत्तिरीतच राहीला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply