Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

दिलासादायक ः सलग दुसर्‍या दिवशी अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या घटली

दिलासादायक ः सलग दुसर्‍या दिवशी अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या घटली

अहमदनगर । वीरभूमी- Apr 26, 2021 • 12:00 AM 1748 views
जिल्ह्यात आज सोमवारी 2866 कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी तब्बल 3195 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज सलग दुसर्‍या दिवशी बाधित आढळलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची जास्त असल्याने अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांनीही नव्याने रेकॉर्ड केले आहे. तर गेल्या चोवीस तासात तब्बल 34 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 686 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात कालच्या पेक्षा वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्क्याहुन 84.80 टक्क्यांवर गेले आहे. यामुळे सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या घटली असून ती आता 22 हजार 840 इतकी झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज सलग दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 726, अकोले 199, जामखेड 45, कर्जत 212, कोपरगाव 182, नगर ग्रामीण 255, नेवासा 110, पारनेर 134, पाथर्डी 89, राहाता 204, राहुरी 103, संगमनेर 295, शेवगाव 211, श्रीगोंदा 120, श्रीरामपूर 112, कॅन्टोन्मेंट 126, मिलिटरी हॉस्पिटल 23 आणि इतर जिल्हा 49 अशा रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या तब्बल 1 लाख 37 हजार 686 वर पोहोचली आहे. तर सध्या 22 हजार 840 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या चोवीस तासात 34 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आज पर्यंत 1849 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

नागरिकांनी कोरोना विषयी असलेली भिती दूर करून धाडसाने उपचार करून घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो हे या आकडेवारीतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घ्यावेत, नियमित मास्क वापरावा व शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सलग दुसर्‍या जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या घटल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply