Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

आ. मोनिका राजळे यांनी उभारले दिव्यांगासाठी कोविड सेंटर

राज्यातील पहिलाच उपक्रम । दिव्यांग सावली संघटनेकडून मानले आभार

शेवगाव । वीरभूमी- Apr 28, 2021 • 12:00 AM 2295 views
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक निरापराध नागरीकांचा उपचाराअभावी बळी गेलेला आहे. राज्यातील अरोग्य सुविधा कमी पडत आहे. कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या तपासणी, उपचार किंवा लसीकरणबाबत कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना किंवा भूमिका नसल्याने भविष्यातील अडचण ओळखून दिव्यांगासाठी आ. मोनिका राजळे यांनी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेने केली होती. या मागणी तातडीने पूर्ण करत आ. मोनिका राजळे आपल्या आदी फाउंडेशनच्या माध्यमातून शेवगाव येथे 100 बेडचे लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर सुरू करत त्यामध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे.

या कोविड सेंटरचे उद्घाटन ह. भ. प. राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांगासाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारल्याबद्दल सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे व चाँद शेख यांनी आ. मोनिका राजळे यांचे आभार मानले.

यावेळी सावली दिव्यांग संस्थचे उपाध्यक्ष चाँद शेख म्हणाले, सावली दिव्यांग संस्थेच्या मागणीला यश आले असून दिव्यांग कोरोना सेंटर चालू करून आ. मोनिका राजळे यांनी दिव्यांग बांधवांना दिलासा दिला. त्याच प्रमाणे भविष्यात लसीकरणासाठी गर्दी होणार असून दिव्यांग बांधवाना कोरोना लसीकरण स्वतंत्रपणे करण्याबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांना विनंती केली. या मागणीलाही तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना भाकड, गटविकास अधिकारी महेश डोके, पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, आरोग्य अधिकारी डॉ. रामेश्वर काटे, विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर,

भाजपाचे सरचिटणीस सुनील रासणे, माजी उपनगराध्यक्ष वजीर शेख, माजी नगरसेवक सागर फडके, कमलेश गांधी, नवनाथ कवडे, गंगा खेडकर, तापडिया महाराज, सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख, सचिव नवनाथ औटी, सावली दिव्यांग संघटना तालुका उपाध्यक्ष संभाजी गुठे, कार्याध्यक्ष मनोहर मराठे, शहरउपाध्यक्ष सुनील वाळके, राजू दुसंगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र कोविड सेंटर सुरू झाल्याने दिव्यांग बांधवामध्ये कोरोना विषयी असलेली दहशत कमी झालेली आहे. कोरोनाग्रस्त दिव्यांग बांधवांनी या सेंटरमध्ये दाखल होवुन अद्यावत सुविधेद्वारे आपल्यावर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन नवनाथ औटी यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply