Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

कोरोना बाधित अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 5 ने वाढली

आज एकाही मृत्यूची नोंद नसल्याने दिलासा

अहमदनगर । वीरभूमी- Apr 28, 2021 • 12:00 AM 1590 views
जिल्ह्यात बुधवारी 3122 कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी तब्बल 3117 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तीन दिवस कोरोना बाधितांचा कमी होणारा आकडा आज 5 ने वाढला असून अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 22 हजार 705 एवढी झाली आहे.

सलग तीन दिवस बाधित आढळलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या आज कमी झाली. यामुळे अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या 5 ने वाढली आहे. तर कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची टक्क्ेवारीही वाढली असून ती आता 85.36 एवढी झाली आहे.

तसेच गेल्या चोवीस तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नसल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 528 इतकी झाली आहे. यामुळे सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 5 ने वाढली असून ती आता 22 हजार 705 इतकी झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एकाही कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद नसल्याने दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 898, अकोले 133, जामखेड 109, कर्जत 169, कोपरगाव 76, नगर ग्रामीण 368, नेवासा 106, पारनेर 157, पाथर्डी 120, राहाता 249, राहुरी 136, संगमनेर 128, शेवगाव 53, श्रीगोंदा 86, श्रीरामपूर 225, कॅन्टोन्मेंट 40, मिलिटरी हॉस्पिटल 26, इतर जिल्हा 35 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या तब्बल 1 लाख 43 हजार 528 वर पोहोचली आहे. तर सध्या 22 हजार 705 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या चोवीस तासात एकाही मृत्यूची नोंद नाही. यामुये आज पर्यंत 1919 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद कालच्या प्रमाणेच आहे.

नागरिकांनी कोरोना विषयी असलेली भिती दूर करून धाडसाने उपचार करून घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो हे या आकडेवारीतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घ्यावेत, नियमित मास्क वापरावा व शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply