Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

नगर जिल्ह्यात आज आढळले 2935 कोरोना बाधित

अकोले, कर्जत वगळता इतर तालुके 100 च्या पुढे

अहमदनगर । वीरभूमी - Apr 29, 2021 • 12:00 AM 2080 views
आज गुरुवारी नगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 2935 कोरोना बाधित आढळले. यामध्ये काही तालुक्यातील आकडा कमी झाला तर काहींचा आकडा वाढला आहे.

दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांना गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली होती. त्यानंतर काल बुधवारी 3122 वर गेलेला आकडा आज 2935 वर आला आहे. यामुळे नगरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वाढत्या कोरोना बाधिातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग साखळी तोडू शकतो. मात्र नागरिकांमधून कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

आज गुरुवारी जिल्ह्यात 2935 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 794, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1242 तर अँटीजेन चाचणीत 899 असे 2935 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 657 वर गेला असून नगर ग्रामीण 307, राहाता 260, संगमनेर 247, श्रीगोंदा 238, राहुरी 198, जामखेड 153, शेवगाव 128, कोपरगाव 111, श्रीरामपूर 110, पाथर्डी 105, पारनेर 103, नेवासा 100, कर्जत 78, भिंगार कन्टेमेंट 75, इतर जिल्हा 42, मिलटरी हॉस्पिटल 12, अकोले 11 असे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply