Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगर जिल्ह्यात आज आढळले 3822 कोरोना बाधित

संगमनेर सर्वोच्च; श्रीगोंदा, कर्जतमध्ये पुन्हा वाढ

अहमदनगर । वीरभूमी - May 02, 2021 • 12:00 AM 2469 views
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज शनिवारच्या तुलनेत कमी झाला आहे. आज जिल्ह्यात 3822 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा कमी होऊन संगमनेर तालुक्याने सर्वोच्च पातळी गाठली आहे. तसेच श्रीगोंदा, कर्जतनेही राहाता तालुक्याला मागे टाकले आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जामखेड तालुका वगळता इतर तालुके शंभरच्या पुढे आहेत. कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे नगरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

बेजबाबदार नागरिकांमुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून लॉकडाऊनचाही कोणताही परिणाम होतांना दिसत नाही. त्यातच लस, ऑक्सिजन, रेमडिसीवीर व औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच बेडही फुल्ल झाले आहेत. वाढत्या कोरोना बाधिातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग साखळी तोडू शकतो. मात्र नागरिकांमधून कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

आज रविवारी जिल्ह्यात 3822 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1288, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1587 तर अँटीजेन चाचणीत 947 असे 3822 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर 566, नगर शहर 547, श्रीगोंदा 347, नगर ग्रामीण 317, कर्जत 267, राहाता 259, कोपरगाव 210, पारनेर 201, अकोले 192, राहुरी 187, नेवासा 171, शेवगाव 155, पाथर्डी 127, श्रीरामपूर 104, इतर जिल्हा 75, भिंगार कन्टेमेंट 61, जामखेड 18, मिलटरी हॉस्पिटल 14, इतर राज्य 04 असे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply