Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

कोरोना रोखण्यासाठी या पालिकेने केली नाकाबंदी

कोरोना रोखण्यासाठी या पालिकेने केली नाकाबंदी

पाथर्डी । अनिल खाटेर May 03, 2021 • 12:00 AM 1752 views
तहसीलदारांच्या सूचनेनुसार पाथर्डी पालिका प्रशासनाने शहराची नाकाबंदी केली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर बांबू बांधून व काट्या टाकून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

पालिका प्रशासन शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सज्ज झाले असून विनाकारण फिरणार्‍यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहे.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी तातडीची संयुक्त बैठक घेवून शहरातील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. प्रतिबंध असलेले सर्व व्यवसाय सुरू आहेत. बाजारात गर्दीचा पूर वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक वाढत्या गर्दीमुळे त्रस्त होऊन वाढती रुग्ण संख्या रोखणे प्रशासनाची परीक्षा पाहणारे ठरत आहे. शहर व उपनगरांमध्ये स्वतंत्रपणे पथके तैनात करण्यात येऊन मोटरसायकलवर शहरभर फिरणारे पथक वेगळे असणार आहे.

दंडात्मक कारवाई प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पालिका प्रशासनास दिल्याने सर्व कर्मचारी या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहेत. बॅरिगेटिंग काढणे, तोडणे याविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.

मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व आय्युब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या विविध विभागातील प्रमुखांनी शनी मंदिर, कसबा पेठ, उर्दु शाळा परिसर, नाथनगर मुख्य रस्ता बॅरीगेटिंग केले आहेत. उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व पथके एकाच वेळी कार्यरत होतील. फळबाजार व भाजीबाजार एका ठिकाणी न बसवता अशा विक्रेत्यांना शहरभर फिरण्यास सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी असेल. लवकरच रस्ते मोकळे करून वाहतुकीस योग्य केले जाईल.

राष्ट्रीय महामार्गासह, नवी पेठ, चिंचपूर रोड, बाजारतळ, उपनगरांमधील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अस्थायी अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. या बॅरीगेटिंग मोहिमेमध्ये गौरव आदिक, महेश कवादे, लक्ष्मण हाडके, दत्ता ढवळे, रशीद शेख, ज्ञानू सिंग परदेशी, जावेद शेख, बंडू फळे, सोमनाथ गर्जे, शिवा पवार आदी विभाग प्रमुख व कर्मचारी सहभागी झाले आहे.

रस्त्यावर व ओट्यावर विनाकारण बसणार्‍या विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्याचा निर्णय पाथर्डी पोलिसांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply