Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात कोरोनाचा आज नवा उच्चांक

जिल्ह्यात कोरोनाचा आज नवा उच्चांक

अहमदनगर । वीरभूमी - May 07, 2021 • 12:00 AM 3539 views
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुन्हा कोरोना बाधितांचे नव्याने रेकॉर्ड झाले आहे. आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांची संख्या 4594 वर गेली आहे. हा आकडा यावर्षीचा उच्चांक आहे.

कमी झालेली आकडेवारी पुन्हा वाढू लागली आहे. आज कोरोना बाधितांच्या संख्येने नवा उच्चांक केला आहे. जिल्ह्यात आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहरापाठोपाठ नगर ग्रामीण, श्रीगोंदा तालुक्यांची आकडेवारी 400 च्या पुढे आहे. त्याचप्रमाणे संगमनेर, राहाताचा आकडा 300 च्या पुढे आहे.

तर आज पाथर्डी, अकोले, कर्जत, जामखेड वगळता इतर तालुके दोनशेच्या पुढे आहेत. यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू सुरू असतांनाही कोरोना बाधितांची संख्या झटपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1009, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 2665 तर अँटीजेन चाचणीत 920 असे 4594 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 732, नगर ग्रामीण 463, श्रीगोंदा 425, संगमनेर 381, राहाता 315, राहुरी 287, कोपरगाव 277, श्रीरामपूर 247, पारनेर 230, शेवगाव 212, नेवासा 207, अकोले 187, कर्जत 180, पाथर्डी 132, इतर जिल्हा 126, जामखेड 106, भिंगार कन्टेन्मेंट 61, मिलटरी हॉस्पिटल 18, इतर राज्य 08 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply