Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव तालुक्यात सात दिवसाचा जनता कर्फ्यू

शेवगाव तालुक्यात सात दिवसाचा जनता कर्फ्यू

शेवगाव । वीरभूमी - May 07, 2021 • 12:00 AM 2417 views
शहरासह तालुक्यात वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येमुळेे शेवगाव तालुक्यात मंगळवार दि. 11 मे ते सोमवार दि. 17 मे या कालावधीत सात दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या काळात आरोग्यसेवा, पेट्रोल पंप, दूध संकलन सुरू राहणार असून किराणासह इतर व्यवसाय बंद असणार आहेत. या जनता कर्फ्यूबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सुचना काढली असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

शेवगाव शहर व तालुक्यात अनेक दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढताच आहे. ग्रामीण भागातील अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे गरजेचे आहे. तरच कोरोना आटोक्यात येईल. याबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार शेवगाव शहर व तालुक्यात मंगळवार दि. 11 मे ते सोमवार दि. 17 मे या कालावधीत सात दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत दवाखाने व रुग्णालये, औषधांची दुकाने, सुरू राहतील मात्र इतर वस्तुंची विक्री करता येणार नाही. पेट्रोल व डिझेल पंप (फक्त अत्यावश्यक सेवेसाठी), दूध संकलन सकाळी 7 ते 9 या कालावधीत सुरू राहील.

तर अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विकेते व इतर सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून कोरोना साखळी तोडण्यासाठी मदत करावी. कोणीही नियम तोडू नये, नियम तोडणार्‍यावर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply