Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

रेमडिसीवीरची मागणी 130, मिळाले 14

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील परिस्थिती । असे आहे शनिवारसाठीचे वाटप

पाथर्डी । वीरभूमी - May 07, 2021 • 12:00 AM 1417 views
रेमडिसीवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत त्याचे हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये असलेल्या बेडच्या संख्येनुसार इंजेक्शनचे वाटप केले जाते. या वाटपात शनिवार दि. 7 मे 2021 साठी पाथर्डी तालुक्यासाठी 07 व शेवगाव तालुक्यासाठी 07 असे 14 रेमडिसीवीर इंजेक्शन मिळाले आहेत.

रेमडिसीवीर इंजेक्शनसाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील हॉस्पिटल व कोविड सेंटर यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदणी केली होती. ही नोंदणी 130 इंजेक्शनची आहे. मात्र दोन्ही तालुक्यासाठी फक्त 14 रेमडिसीवीर इंजेक्शन मंजूर झाले आहेत. मागणी व पुरवठा यातील तफावतीमुळे कोरोना बाधितांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तर मिळालेले रेमडिसीवीर कोणत्या रुग्णाला द्यावे असा प्रश्न उपचार करणार्‍या डॉक्टरांसमोर उभा राहीला आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी उपचारात महत्वाची भूमिका बजावणारे रेडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजात होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर याचे वितरण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे.

त्याप्रमाणे जिल्ह्यासाठी आलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचे वाटप ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड संख्यानुसार समप्रमाणात याचे वाटप करण्यात येते. त्याप्रमाणे कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता पाथर्डी तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व कोविड सेंटर करिता एकूण 07 व शेवगाव तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल व कोविड सेंटर करिता एकूण 07 असे एकुण 14 रेमडिसीवीर इंजेक्शन संगमनेर येथील बाफना मेडिको यांचेकडे प्राप्त झालेले आहेत.

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार उपरोक्त इंजेक्शन पुढील प्रमाणे हॉस्पिटल व कोविड सेंटरकरीता वाटप करण्यात येत आहे.

त्याप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील गर्जे हॉस्पिटल 02, ज्ञानेश्वर माऊली हॉस्पिटल 01, पाथर्डी कोविड केअर सेंटर 02, तिसगाव येथील श्री कोविड केअर सेंटर 01, मिरी येथील दत्तप्रसाद कोविड केअर सेंटर 01 असे 07 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत.

तसेच शेवगाव तालुक्यातील शेवगाव येथील आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 01, अर्थव हॉस्पिटल 01, बडे हॉस्पिटल 01, साई कोविड सेंटर 01, बोधेगाव येथील बोधेश्वर कोविड सेंटर 01, शेवगाव येथील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालय 00, शेवगाव येथील फडके हॉस्पिटल 01, शेवगाव येथील साईपुष्प हॉस्पिटल 01 व शेवगाव येथील डॉ. के. डी. कांबळे मेमोरियल हॉस्पिटल 00 असे 07 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत.

तरी संबधित रुग्णालयांनी वरील प्रमाणे सदर एजन्सीकडून त्वरीत इंजेक्शन ताब्यात घ्यावेत. या इंजेक्शनचा पुरवठा संगमनेर येथील बाफना मेडिको या घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाला असून सदर औषधांच्या वाहतुकीसाठी 2 अंश सेल्सियस ते 8 अंश सेल्अियस या तापमानास नियंत्रण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संबधित खाजगी हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर यांना इंजेक्शनचा साठा प्राप्त करतेवेळी थर्माकॉल बॉक्स आणि कुलंट सोबत ठेवण्यात यावे.

तरी रेमडिसीवीर इंजेक्शन वाटपाबाबत काही अडचणी असल्यास पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply