Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

लेह-लडाख सीमेवर कर्तव्यावर असणार्‍या जवानाला वीरमरण

माका गावावर शोककळा । मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

माका । वीरभूमी- May 10, 2021 • 12:00 AM 4188 views
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कार्यरत असलेले नेवासा तालुक्यातील माका गावाचे भूमिपुत्र जवान नवनाथ रभाजी भुजबळ (वय 35) हे लेह -लडाख सीमेवर कर्तव्यावर असताना हृदविकारने त्यांचे निधन झाले. या घटनेने माका गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

जवान नवनाथ भुजबळ यांचे कुटुंबियांनी दिलेल्या माहिती नुसार, नवनाथ हे 15 दिवसांपूर्वी माका येथून ड्युटीवर गेले होते. कालच त्यांची चंदीगडहुन लेह-लडाख येथे बदली झाली होती. लेह मधील त्यांचा ड्युटीचा आजचा पहिलाच दिवस होता.

आज सोमवारी दि. 10 मे रोजी सकाळी 6 वाजता सैन्य दलाकडून नवनाथच्या कुटुंबियांना मोबाईलवर फोन आला असता त्यांनी नवनाथचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे कळविले.

जवान नवनाथ भुजबळ यांचा मृतदेह श्रीनगरहुन विमानाने पुण्याला व पुण्याहुन लष्करी वाहनाने नेवासा तालुक्यातील माका या त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जनाव नवनाथ भुजबळ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे. जवान नवनाथ भुजबळ यांच्या निधनाने माका गावावर शोककळा पसरली आहे.

अंत्यविधी उद्या मंगळवारी (दि. 11 मे) रोजी दुपारी नेवासा तालुक्यातील माका येथील भुजबळ वस्तीवर होणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply