Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अकरा वर्षीय मुलाची हत्या; शेवगाव तालुका हादरला

अकरा वर्षीय मुलाची हत्या; शेवगाव तालुका हादरला

शेवगाव । वीरभूमी- May 11, 2021 • 12:00 AM 7773 views
शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे 11 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घराशेजारी काम करत असतांना घरी मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलाच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या मुलाचे नाव सार्थक आंबादास शेळके (वय 11 वर्षे) असे असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने शेवगाव तालुका हादरला असून या बालकाची कोणी व कोणत्या कारणाने हत्या केली, याचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथील अंबादास शेळके हे सोमवारी दुपारी आपल्या कुंबासमवेत घराशेजारी असलेल्या वाडग्यात काम करत होते. या दरम्यान सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान आंबादास शेळके यांनी आपला मुलगा सार्थक याला घरामध्ये असलेला मोबाईल घेऊन घेण्याचे सांगितले.

वडीलांनी मोबाईल आणण्याचे सांगितल्याने सार्थक हा घरामध्ये मोबाईल आणण्यासाठी गेला. बराच वेळ झाला तरी सार्थक का आला नाही, हे पाहण्यासाठी गेले असता सार्थक याच्या मानेवर धारदार शस्त्राने मानेवर वार झाल्याने खाली कोसळलेला दिसून आला. ही घटना सोमवारी सायंकाळी 4 ते 4.30 वाजेच्या दरम्यान घडली.

सार्थक याला तातडीने गावातील संतोष काळे यांच्या मदतीने मोटारसायकल वरून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. तेथे त्याला तपासले असता सार्थक हा मयत झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिस ठाण्याचे प्रभाकर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी मयताचे वडील आंबादास दत्तू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्थक शेळके याच्यावर स्वतःच्य घरातच असा अचानक हल्ला करून खून झाल्याने या घटनेने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या खुनाचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभे राहीले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply