Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांची आकडेवारी पुन्हा घटली

आज मंगळवारी आढळले 3184 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - May 11, 2021 • 12:00 AM 1732 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी आज पुन्हा कमी झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात 3184 कोरोना बाधित आढळले. दोन दिवस कमी तर दोन दिवस वाढत असलेली कोरोना बाधितांची आकडेवारी आज पुन्हा घटली आहे.

सोमवारी चार हजार पार गेलेला कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा खाली येत 3184 वर आला आहे. कालपासून संगमनेर प्रथम क्रमांकावर आहे. मात्र एकुण आकडेवारी कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. क्रमांक दोनवर अकोले, त्यानंतर पाथर्डी, पारनेर, नगर ग्रामीण, कर्जत, नेवासा अशी क्रमवारी असून यांची आकडेवारी दोनशेच्या पुढे आहे.

आज प्रथमच नगर शहराची आकडेवारी दोनशेच्या आत आली असल्याने कडक लॉकडाऊनचा परिणाम आत्ता कुठे दिसू लागला आहे. मात्र कडक लॉकडाऊन असतांनाही पाथर्डी, पारनेरची आकडेवारी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आजही सर्वच तालुक्याची आकडेवारी शंभरच्या पुढेच राहीली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आकडेवारी कमी झाल्याने दिलासा मिळत आहे. आकडेवारी अशीच घट होत राहीली तर लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1348, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1094 तर अँटीजेन चाचणीत 742 असे 3184 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 361, अकोले 276, पाथर्डी 269, पारनेर 246, नगर ग्रामीण 239, कर्जत 225, नेवासा 209, राहुरी 196, नगर शहर 195, श्रीरामपूर 183, शेवगाव 169, राहाता 155, कोपरगाव 135, जामखेड 129, श्रीगोंदा 112, इतर जिल्हा 49, भिंगार काँटोन्मेंट 34, मिलटरी हॉस्टिपीटल 01, इतर राज्य 01 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply