Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

दिलासादायक ः कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी वाढली

आज बुधवारी 4439 जणांची कोरोनावर मात

अहमदनगर । वीरभूमी- May 12, 2021 • 12:00 AM 1569 views
जिल्ह्यात आज तब्बल 4439 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 91 हजार 546 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 87.35 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 2711 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 25 हजार 322 इतकी झाली आहे.

आज शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 136, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1668 आणि अँटीजेन चाचणीत 907 रुग्ण बाधीत आढळले.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 753, अकोले 203, जामखेड 130, कर्जत 242, कोपरगाव 238, नगर ग्रामीण 464, नेवासा 154, पारनेर 283, पाथर्डी 144, राहाता 280, राहुरी 213, संगमनेर 386, शेवगाव 151, श्रीगोंदा 300, श्रीरामपूर 283, कॅन्टोन्मेंट 89, मिलिटरी हॉस्पिटल 09, इतर जिल्हा 106 आणि इतर राज्य 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 19 हजार 269 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 91 हजार 546 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2401 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 25 हजार 322 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, विनाकारण घराबाहे पडू नये, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply