Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांच्या आकड्यात दुसर्‍या दिवशीही घट

नेवासा, पाथर्डी, शेवगाव, जामखेडचा आकडा शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी - May 12, 2021 • 12:00 AM 2582 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये आज दुसर्‍या दिवशी घट झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात 2711 कोरोना बाधित आढळले. या आकडेवारीमुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अशीच आकडेवारी कमी होत राहीली तर लवकरच संपूर्ण जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होईल असा विश्वास निर्माण होत आहे.

नेहमी कायम क्रमांक एकवर असलेल्या नगर शहराचा आकडा आजही कमी झाला आहे. तर अकोले तालुक्यात 275 कोरोना बाधित आढळल्याने पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

आज प्रथमच एकाही तालुक्याची आकडेवारी तिनशेच्या पुढे नसल्याने जिल्ह्या वासीयांना दिलासा मिळत आहे. तर नेवासा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत आली आहे.

नागरिकांनी अशीच शिस्त पाळत नियमाचे पालन केल्यास जिल्ह्यातील आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास निर्माण होत आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 136, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1668 तर अँटीजेन चाचणीत 907 असे 2711 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले 275, नगर ग्रामीण 268, संगमनेर 256, नगर शहर 250, पारनेर 244, राहाता 216, श्रीरामपूर 196, कोपरगाव 176, राहुरी 168, श्रीगोंदा 135, कर्जत 131, नेवासा 95, पाथर्डी 92, शेवगाव 66, इतर जिल्हा 63, जामखेड 62, भिंगार काँटोन्मेंट 12, मिलटरी हॉस्टिपीटल 04, इतर राज्य 02 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply